HomeUncategorizedलातूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटनेची बैठक रविवार दि. 1 रोजी संपन्न झाली

लातूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटनेची बैठक रविवार दि. 1 रोजी संपन्न झाली

लातूर जिल्हा योग निसर्गोपचार डॉक्टर्स यांची बैठक संपन्न (बालाजी पडोळे) विशेष प्रतिनिधी शिरूर ताजबंद :- श्री राज राजेश्वरी देवी संस्थान उदगीर येथे लातूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटनेची बैठक रविवार दि. 1 रोजी संपन्न झाली. बैठकीस अध्यक्षस्थानी आयुष मंत्रालय भारत सरकारचे सदस्य तथा आयएनओचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनंत बिरादार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आयुष अधिकारी डॉ.सुधीर बनशेळकीकर हे होते यावेळी डॉ. अनंत बिरादार यांनी आयुष मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सी. सी.आर.वाय.एन. व एन. आय. एन. पुणे आणि मा. पद्मश्री जयप्रकाश अगरवाल यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच संघटना मजबूत करून देशातील आय. एन. ओ. च्या आरोग्य चळवळीत योगदान देण्यासाठी व्यावसायिकांना प्रवृत्त केले. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडणारा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 मोठ्या प्रमाणात साजरा करून योग निसर्गोपचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले व आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आय. एन. ओ. मार्फत देशभरात 5000 ठिकाणी योग शिबीरे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी डॉ.अनंत बिरादार यांचा सत्कार जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर व श्री राज राजेश्वरी देवी संस्थानचे विश्वस्त श्री प्रतीक निटुरे व डॉ. मनीषा येरटे यांनी केला.निसर्गोपचार तज्ञांचे हक्क व कर्तव्य तसेच या बाबतीत महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे शासन निर्णय याबद्दल डॉ. सुधीर बनशेळकीकर जिल्हा आयुष अधिकारी यांनी माहिती दिली. निसर्गोपचार तज्ञ यांना बोगस वैद्यक व्यावसायिक समजण्यात येऊ नये. अशी माहिती त्यांनी दिली.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रस्तावना डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे यांनी केली तर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुरेश गरड,डॉ.दिपक पुणेकर,डॉ. रामचंद्र गरड,डॉ. किरण पाटील, सौ. ज्योती पुणेकर यांनी केले. यावेळी एन. आय. एन. पुणे येथून गांधी तत्वज्ञान फेलोशिप (हृदय व रक्त वाहिन्या संबंधी विकार , प्रकार २ मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांच्या उपचारांमध्ये विशिष्ट योग आणि निसर्गोपचार उपायांचा अभ्यास )पुर्ण केल्या बाबत डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे यांचा व श्री सुनील कुमार लुना यांनी न्युरो थेरपी अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्या बाबत मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी वैद्य देशमुख भाऊराव डॉ. प्रभाकर डोंगरे डॉ. ब्रम्हा एन. आर., डॉ. अशोक गायकवाड, डॉ. आनंद वरवटे, डॉ.शिवानी येरटे, श्री सागर कुलकर्णी,श्री शैलेश सूर्यवंशी,सौ. मंदा पुणेकर, श्री देवीदास पुणेकर, सौ. महानंदा सोनटक्के सौ.प्रेमा पाटील, श्री आकाश डोंगरे, राजनंदिनी कांबळे, सुजल कांबळे, प्रकाश कांबळे सह सुमारे 30 निसर्गोपचार तज्ञ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Jharkhand
broken clouds
38.6 ° C
38.6 °
38.6 °
30 %
4kmh
84 %
Sun
39 °
Mon
38 °
Tue
31 °
Wed
33 °
Thu
30 °

Most Popular