
जिजाऊ रथयात्रेचे शिरूर ताजबंद मध्ये उत्साहात स्वागत .
( बालाजी पडोळे )शिरूर ताजबंद येथे जिजाऊ रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदार्पण होताच येथील मराठा सेवा संघ, सकल मराठा समाज बांधव, स्थानिक नागरीकांतन जल्लोषात स्वागत करून मान्यवरांच्या हास्ते राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देवून जयघोष करण्यात आला . तसेच रथयात्रे सोबत आलेल्या शिवप्रेमी चे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले . यावेळी जेष्ट नागरीक माजी सरपंच साहेबराव जाधव, माजी पोलीस पाटील उत्तमराव पाटील,अहमदपूर कृउबा सभापती तथा चेअरमन मंचकराव पाटील,सरपंच मच्छिंद्र वाघमारे, सोसायटीचे चेअरमन तुळशीराम भोसले, प्राचार्य दिपक भराटे,दिलीपराव पाटील गणेशराव कापसे, महेश पतसंस्थेचे उपअध्यक्ष बाबुराव सैदापूरे, ग्राप चे बांधकाम सभापती युवराज पाटील, रणधीर पाटील,शिवानंद भोसले, बालाजी पडोळे,विक्रम भोसले, गोविंदराव कापसे, उद्धव भोसले,राहुल हजारे, युवराज शिंदे, राजकुमार चव्हाण, संजय सोलपूरे, शिवराज पाटील,बाळसाहेब डोंगरे, संतोष महापूरे, पिंटू पाटील, दत्ता कोंडलवाडे सह महिलांची मोठी उपस्थिती होती . यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक,सुत्रसंचलन व आभार बि .जी . पडोळे यांनी मानले .