Homeस्वास्थ्यज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर सूर्या फाउंडेशन, आयएनओ व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ...

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर सूर्या फाउंडेशन, आयएनओ व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ नॅचरोपॅथी, आयुष मंत्रालय, भारत सरकार,चैतन्य चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने श्री बालाजी मंदिर शिरूर ताजबंद चे संचालक श्री दत्तात्रय जवळगे यांच्या पुढाकारातून संपन्न

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न पत्रकार ( बालाजी पडोळे ) दिनांक 7 रोजी सकाळी 9.30 वाजता सूर्या फाउंडेशन, आयएनओ व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ नॅचरोपॅथी, आयुष मंत्रालय, भारत सरकार,चैतन्य चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने श्री बालाजी मंदिर शिरूर ताजबंद चे संचालक श्री दत्तात्रय जवळगे यांच्या पुढाकारातून श्री बालाजी मंदिर येथे गावचे माजी सरपंच व सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता ऍड. श्री साहेबराव जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी धन्वंतरी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व निसर्गोपचार गीत व प्रार्थना घेण्यात आली. शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून योगाचार्य श्री शिवमूर्ती भातांब्रे व योग भूषण सौ. कलावती भातांब्रे हे उपस्थित होते श्री दिगंबर बुरसपट्टे सर यांनी गांधी तत्त्वज्ञानाने सामाजिक, मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे फायदे यावर व्याख्यान दिले, आणि सेंद्रिय शेती उत्पादक व कृषी तज्ञ श्री सचिन वळसंगीकर यांनी शेंद्रीय पद्धतीने पिकविलेले अन्न धान्य खाण्याचे फायदे सांगितले श्री डॉ. वाघमारे लक्ष्मीकांत संशोधकीय अभ्यासक एन. आय. एन. पुने यांनी हृदय विकार व मधुमेह प्रकार 2 या सारखे असंसर्ग जन्य आजारांचा त्रास जेष्ठ नागरिकांना होऊ नये म्हणून व्याख्यानाचे व तपासणीचे नियोजन केले डॉ.सुरेश गरड आहार नियोजन व आजार प्रतिबंधित करण्याच्या पद्धती या विषयावर व्याख्यान दिले, डॉ. दिपक पुणेकर यांनी सांधेवात व दैनंदिन अंगदुखी या विषयावर मार्गदर्शन केले तर योग प्रात्यक्षिक व मार्गदर्शन श्री सागर कुलकर्णी व सूर्यकांत मोरे यांनी केले . शिबिरात रुग्णांची तपासणी डॉ. मालसमींदर एस.एल.,डॉ. लक्ष्मीनारायण मद्रेवार, डॉ.गायकवाड अशोक, डॉ.हालदर किशोर, डॉ. बेले मारुती , डॉ. ऋतुजा वाघमारे यांनी केली. या शिबिराचा लाभ 500 जेष्ठ नागरिकांनी घेतला व यामध्ये संधिवात, उच्च रक्तदाब व मधुमेह,त्वचा विकार च्या रुग्णावर उपचार करण्यात आले. या शिबिराची प्रस्तावना श्री सिद्धेश्वर औरादे यांनी तर व्यवस्थापन व आभार प्रदर्शन श्री राजकुमार बलदवा यांनी केले तर कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री विश्वनाथ जाधव, श्री शिवाजी श्रीमंगले यांनी निशुल्क केले, श्री कावळे बालाजी व श्री अमोल गादगे यांनी बैठक व्यवस्था मोफत पुरवली या शिबिरात चैतन्य वाघमारे, समाधान वाघमारे, आकाश कोंडलवाडे, ऍड वैभव जाधव, श्री गोरख वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
26.1 ° C
26.1 °
26.1 °
25 %
1.4kmh
1 %
Fri
38 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
39 °
Tue
39 °

Most Popular