पॅराडाईज इंग्लिश स्कूलचा पहिला आनंदोत्सव जल्लोषात साजरा . शिरूर ताजबंद ( बालाजी पडोळे )अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे पहिले स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव जाधव होते. स्नेहसंमेलनाचेउद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार बाबासाहेब पाटील होते. यावेळी माजी.राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, केंद्रप्रमुख .कासार चेअरमन शामराव टिकोरे .सचिव बाबासाहेब हाळीकर, प्रा.प्रताप पाटील,केंद्रीय मुख्याध्यापक केशव मुंडकर उपस्थित होते. चिमुकल्यांनी नेत्र दीपक असा नृत्याविष्कार करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेत घेतली जातात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पॅराडाईज इंग्लिश स्कूल करत आहे असे मत शाळेच्या मु.अ.शालिनी कुमठेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले. ना .सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्कूलची आवश्यकता लक्षात घेऊन कुमठेकर यांनी पॅराडाईज इंग्लिश स्कूलची सुरुवात केली व त्यांना आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले व पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन वेळोवेळी शाळेत जाऊन भेटी द्याव्यात असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी अनिल कुलकर्णी बळीराम.भिगोले, अंकुशराव कानवटे, दिनानाथ राचमाळे सभापती बालासाहेब पाटील, वामनराव पाटील, महेश बिलापट्टे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. दीपा कुलकर्णी, सौ माया मोठेराव, सौ.चांगुना राठोड यांनी परिश्रम घेतले. सुभाष तेलगाने, राजपाल जाधव, मारोती जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तसेच सौ.भाग्यश्री जाधव, कल्पना आबंदे, मयुरी पाटील,सौ.राजश्री दोडके ,अनिल राजे, ज्ञानेश्वर तोगरे, चंद्रकांत पवार, प्रशांत कांबळे,विशाल देगुरे, पांचाळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. गणपती बर्डे यांनी सर्वांचे आभार मानले व वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे पहिले स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न
RELATED ARTICLES